Chandrapur – घराला पुराचा वेढा, आजी एकटीच घरात अडकलेली, पण हार नाही मानली! थरारक प्रसंग कॅमेरात कैद

चंद्रपूर जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलं आहे. अनेक नद्या धोक्याच्यापातळीवर वाहू लागल्या आहेत. यामुळे बऱ्याच गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं असून अनेक गावात पोलिसांनी आपत्ती मदत केंद्रातून मदत पाठवून लोकांना पुरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी पाठवलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

चंद्रपूर शहराजवळील चिचपल्ली नजीकच्या गोंडसावरी येथे असाच एक प्रसंग घडला आहे. या भागात चाल झोपला मारोती मंदिर परिसरात एक वयोवृद्ध आजी गेल्या काही दिवसांपासून वास्तव्याने होती. ती ज्या घरात राहत होती त्या घराला पुराने वेढा दिला. चौफेर पाणी. घरात एकटी आजी. पाण्याची पातळी वाढत होती त्यामुळे आजीच्या जीव धोक्यात आला होता. प्रशासनाला याची माहिती मिळताच मदतीसाठी पोलीस बचाव पथकाला पाठविण्यात आले. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने आजीला घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. आजीला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. हा विडिओ समाजमाध्यमात वायरलं होत आहे.

पुराचं पाणी वाढत असताना देखील आजीनं धीर सोडला नाही. तिनं बचाव पथकाची वाट बघितली. अखेर आजीला घरातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.