
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET-UG पेपर लीकच्या वादावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी म्हणाले की, ‘NEET समस्या अशी आहे की देशात लाखो विद्यार्थी आहेत जे काय चालले आहे याबद्दल अत्यंत चिंतित आहेत आणि ज्यांना वाटू लागले आहे की हिंदुस्थानची परीक्षा प्रणाली फसवी आहे. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही ही परीक्षा पद्धती विकत घेऊ शकता आणि विरोधकांचीही हीच भावना आहे’. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मंत्री (धर्मेंद्र प्रधान) यांनी स्वतः सोडून सगळ्यांनाच दोष दिला आहे. मला असे वाटत नाही की त्यांना येथे काय चालले आहे याच्या मूलभूत गोष्टीही समजत नसाव्यात’.
हे प्रकरण व्यवस्थेच्या पातळीवर सोडवण्यासाठी सरकार काय करणार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
यावर धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, देशाची शिक्षण व्यवस्था फसवणूक असल्याचं म्हणणं चुकीचं आहे.