सुजय विखे जनता जनार्दनाचा अपमान करत आहेत; लंके समर्थकांकडून जबरदस्त टीका

sujay-vikhe-patil-nilesh-lanke

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर ‘EVM’मधील हेराफेरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.याप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना अनेक पर्याय दिले. निवडणूक निकालांच्या घोषणेनंतर ‘EVM’च्या मेमरी चीप व मायक्रो कंट्रोलरच्या पडताळणीसाठी लोकसभा व विधानसभेच्या काही उमेदवारांनी अर्ज केला आहे. पराभूत उमेदवार ‘EVM’ची पडताळणी करण्यासाठी कोणत्याही मतदारसंघातील यंत्राची निवड करू शकतात. यासंदर्भात आतापर्यंत 11 उमेदवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केले आहेत. ‘EVM’च्या फेरपडताळणीबरोबरच मायक्रो कंट्रोलर चिपच्या सुधारणेची मागणी करणारे आठ अर्ज आयोगाकडे आले होते. यातील एक अर्ज सुजय विखे यांचाही आहे.

लोकसभेतील पराभवामुळे सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावर निलेश लंके प्रतिष्ठानचे अॅड. राहुल झावरे यांनी केली आहे.

झावरे यांनी म्हटले आहे की, या एका चिनी कहाणीतील तो राजपुत्र आणि विखे-पाटील घराण्याचे राजपुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात बरेच साम्य आहे. त्या राजपुत्राने आपले खरे रुप दाखविणारा आरसा नाकारला आणि सुजय विखे त्यांना मतदारांनी दाखविलेला आरसा नाकारत आहेत. लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारायचा असतो. कारण जनता सर्वोच्च आहे. जनतेमुळे नेता असतो, नेत्यामुळे जनता असत नाही. नेमकं हेच सुजय विखे विसरले आणि कधी निवडणूक आयोग तर कधी कोर्टाच्या पायऱ्या झिजवू लागले. अशा प्रकारे त्यांनी जनता जनार्दनाने दिलेला कौल नाकारून त्यांचा अपमान करायला सुरुवात केली आहे.

राजकारणात हार-जीत होतच असते. विजय आणि पराजय खिलाडू वृत्तीने स्वीकारता आली पाहिजे. या देशात लोकांचे राज्य आहे. लोकांनी दिलेला कौल मान्य करतो तोच त्यांच्या मनावर राज्य करू शकतो. विखे हा कौल मान्य करीत नाहीत हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे, असे ॲड राहुल झावरे यांनी म्हणले आहे.

गेल्या 26 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने ‘EVM’द्वारे मतदान प्रक्रियेऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. त्याचवेळी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना शुल्क भरून ईव्हीएमची पडताळणी करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. याशिवाय पराभूत उमेदवार लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातील विशिष्ट क्रमांकाच्या ‘EVM’ची पडताळणी करण्याचा पर्याय देऊ शकतात. यामुळे मतदान केंद्रातील संबंधित अधिकाऱ्याने या ईव्हीएममध्ये कोणतीही हेराफेरी केली नसल्याचे स्पष्ट होईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याचाच अर्थ असा की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून इव्हिएम सदोष नाहीत हे सिद्ध करण्यासाठी मॉक पोल घेतले जाणार आहेत. याचा निवडणूक निकालावर कसलाही परिणाम होणार नाही. यावर काही आक्षेप असले तर न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला असतोच.