दिनू रणदिवे स्मृती पुरस्काराने मधू कांबळे सन्मानित

 ‘संविधानाची हत्या आणीबाणीमध्येही झाली नव्हती आणि यापुढंही कुणी करू शकत नाही. ते शक्य नाही,’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते पत्रकार मधू कांबळे यांना यंदाचा पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघात हा सोहळा झाला. यावेळी धर्माधिकारी बोलत होते. मुळात आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती. त्यावेळच्या सरकारने व मंत्रिमंडळाने संविधानातील काही तरतुदींचा वापर करून आणीबाणी लागू केली होती, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मधू कांबळे यांच्या पत्रकारितेचे काwतुक केले. तसंच, दिनू रणदिवे यांच्याही काही आठवणी सांगितल्या. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य पत्रकार गुरबीर सिंग, हारीस शेख, प्रकाश महाडिक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण उपस्थित होते.