
पोलीस, सीबीआय कारवाईची भीती आणि मानवी तस्करीच्या गुह्यात वॉरंट निघाल्याचे भासवत ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दहिसर आणि घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
दहिसर येथे व्यावसायिक राहतात. गेल्या आठवडय़ात त्यांना एका नंबरवरून पह्न आला. पह्न करणाऱयाने सिंगापूर येथे एक कुरिअर पाठवले असून त्यात ड्रग, सिमकार्ड असल्याचे भासवले. ड्रग प्रकरणी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल असल्याचे सांगून पह्न दुसऱया ठगांकडे वर्ग केला. त्या ठगाने त्या पार्सलमध्ये ड्रग असल्याने याची माहिती सीबीआयला द्यावी लागेल, असे सांगितले. त्याच दरम्यान दुसऱया ठगाने मनी लॉण्डरिंगची केस असून आरोपी सोडायचा नाही असे सांगितले. त्या गुह्यात एकाला पकडले असून त्याने तुमचे नाव घेतले आहे. बँक खात्यात पैशाचा व्यवहार झाला आहे, तसेच मानवी तस्करीसाठी त्या बँक खात्याचा वापर झाल्याची भीती घातली. खात्यात दहा लाख रुपये असल्याने चौकशीसाठी दिल्लीला यावे लागेल असे सांगितले. खात्यात असलेली रक्कम जमा करावी लागेल असे सांगून ठगाने पह्न ठेवला. ते पैसे एका खात्यात पाठवल्यावर त्याचे प्रमाणपत्र दिले जाईल अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेऊन त्याने 9 लाख रुपये ट्रान्सफर केले. काही वेळाने त्याना एक प्रमाणपत्र पाठवले. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे त्याच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याने त्याने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथील एका व्यावसायिकाला गेल्या आठवडय़ात एका नंबरवरून पह्न आला. त्याने मोबाईलवरून जुगार सुरू असल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे तुमचा नंबर बंद होणार असल्याचे सांगितले. तो चालू ठेवायचा असल्यास दिल्ली गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांशी चर्चा करा असे त्यांना सांगितले. काही वेळाने त्यांना एका नंबरवरून व्हिडीओ कॉल आला. व्हिडीओ कॉलवर बोलणाऱयाने त्याचे नाव सांगून आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात वॉरंट काढल्याची भीती घातली. त्याची प्रत त्यांना व्हॉटस अपवर पाठवली. दुसऱया दिवशी त्यांना एका नंबरवरून पुन्हा पह्न आला. एकाला मानवी तस्करीच्या गुह्यात अटक केल्याने त्याच्याकडे सहा बँक खाती आढळून आली आहेत. जर सहकार्य केले तर सुटका करू अशा त्याने भूलथापा मारल्या. आरबीआयकडून व्हेरिफिकेशन आणि एनओसीच्या नावाखाली 7 लाख 50 हजार रुपये देण्यास भाग पाडले. पैसे जमा केल्यानंतर त्यांनी पह्न केला. मात्र पह्न उचलला जात नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली.