पवईत मगरी तलावाबाहेर! नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढला असून पवई तलावातील दोन मगरी तलावाबाहेर आल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि पालिकेकडून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. तलाव परिसर रिकामा करण्यात आला आहे. तलावाकडे कुणीही जाऊ नये, असे आवाहन पर्यटकांना करण्यात आले आहे.