
आपल्या देशात वृद्धांची संख्या वाढत आहे. येत्या 2050 सालापर्यंत देशातील वृद्धांची संख्या दुप्पट होईल म्हणजे अंदाजे 34 कोटींचा पल्ला गाठेल. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (यूएनपीएफए) हिंदुस्थानच्या प्रमुख अँड्रिया वोजनर यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. त्यातही वयोवृद्ध महिला एकाकी होतील आणि त्यांना आर्थिक संकटाशी झुंजावे लागेल, असे अँड्रिया वोजनर म्हणाल्या.