निपाह व्हायरसने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

केरळमधील मलप्पूरम येथील निपाह व्हायरसने ग्रस्त 14 वर्षीय मुलाचा आज मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली. या मुलाला सकाळी 10 वाजून 50 मिनीटांनी ह्दयविकाराचा झटका आला. त्यानतंर त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले, मात्र सकाळी साडेअकरा वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

निपाह व्हायरसने संक्रमित मुलाला ऑस्ट्रेलियातून मोनोक्लोनल अँटी बॉडीज देण्यात आल्या होत्या. प्रोटोकॉलनुसार संसर्ग झाल्यानंतर 5 दिवसांच्या आत दिले जाते. या प्रकरणात, बाधित मुलाला अँटीबॉडीज देण्यास विलंब झाला होतका.

मुलाचे तीन नातेवाईक देखरेखीखाली

मृत्यू झालेल्या मुलाचे वडील, काका यांच्यासह तीन नातेवाईक कोझिकोडच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात निरीक्षणाखाली असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. तर उर्वरित चार परिचितांना मलप्पुरम येथील मंजेरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्यापैकी एक आयसीयूमध्ये आहे. दरम्यान, मंजरी मेडिकल कॉलेजमध्ये 30 आयसोलेशन खोल्या आणि 6 खाटांचे आयसीयू तयार केले आहेत

याआधी 2019, 2021 आणि 2023 मध्येही त्याची प्रकरणे आढळून आली आहेत. यासाठी अद्याप कोणतीही लस तयार केलेली नाही. निपाह संक्रमित वटवाघुळ, डुक्कर किंवा माणसांच्या शरीरातील द्रवांच्या संपर्कातून पसरतो.