
रील्सचे वेड सध्या प्रचंड वाढले आहे. त्यासाठी कुणीही वाटेल ते करू शकतो. एका कामवाल्या बाईने रील्ससाठी कॅमेरा हवा म्हणून चक्क दागिन्यांची चोरी केल्याची घटना दिल्लीतील एका बंगल्यात घडली. रील्स करता यावीत यासाठी तीला महागडा डीएसएलआर कॅमेरा खरेदी करायचा होता. नीतू यादव असे तीचे नाव असून दिल्ली पोलिसांनी रविवारी तिला अटक केली.
फोन स्वीच ऑफ केला
नीतूचा फोन स्वीच ऑफ होता. तिने दिलेला पत्ताही खोटा असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेज खंगाळल्यानंतर आणि परिसरातील अन्य लोकांची चौकशी केल्यानंतर नीतू कुठे आहे याचा पोलिसांनी शोध घेतला. एक बॅग घेऊन दिल्लीतून पळ काढत असताना पोलिसांनी तिला अटक केली.
उदरनिर्वाहासाठी घरकाम
ती राजस्थानची असल्याचे तसेच नवरा अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे तीने सांगितले. दिल्लीत आल्यावर उदरनिर्वाहासाठी तीने घरकाम करायला सुरुवात केली. तिन् युटयूब चॅनेल सुरु करून इन्स्टाग्रामवर रील्स टाकायलाही सुरुवात केली.