मुंबईतील 300 एकरहून अधिक मोक्याच्या जागा अदानींना आंदण; आरटीआयअंतर्गत उपलब्ध झालेला तपशील

धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली धारावीकरांचे अन्यत्र स्थलांतर करण्यासाठी अदानींना देण्यात येणाऱ्या काही जागांचा तपशील माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध झाला आहे. त्यानुसार धारावीच्या जागेव्यतिरिक्त सध्या उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार 300 एकरहून अधिक जागा पुनर्वसनाच्या नावाखाली अदानींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे पुढे आले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे बांधण्यासाठी जमिनीसाठी पाठवण्यात आलेल्या मागणीच्या प्रस्तावाचा तपशील आरटीआय अंतर्गत मागवण्यात आला होता. त्याची माहिती यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मागण्यात आलेल्या जमिनीची यादी मागवली. पण बहुसंख्य जागेची माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर आरटीआय अर्जाला दिले आहे.

जागेचा तपशील-किती जागा

(1) मातृदुग्ध शाळेची जागा, कुर्ला – 21 एकर (2)दहिसर जकात नाका – माहिती उपलब्ध नाही (3)मानखुर्द जकात नाका – माहिती उपलब्ध नाही (4)मुलुंड जकात नाका -46 एकर (5)मुलुंड बीएमसी लँड – 18 एकर (6)अक्सा कलेक्टर लँड – माहिती उपलब्ध नाही (7)मालवणी कलेक्टर लँड – माहिती उपलब्ध नाही (8)शीव-वांद्रे रोडवरील टी जंक्शन, धारावी बेस्ट वसाहत इमारत – माहिती उपलब्ध नाही (9) शीव-वांद्रे लिंक रोड टी जंक्शन धारावी येथील जीआरपी स्टाफ क्वार्टर्स क्र. 7 व पोलीस वसाहत क्रमांक14-माहिती उपलब्ध नाही (10) शीव-वांद्रे लिंक रोडवरील टी जंक्शन धारावी येथील एईएमएल कर्मचारी वसहात क्र. 10 व 11- माहिती उपलब्ध नाही (11) शीव- वांद्रे लिंक रोडवरील ओएनजीसी कर्मचारी वसाहत क्र. 8 व 9 – माहिती उपलब्ध नाही (12) बेस्ट कर्मचारी वसाहत – माहिती उपलब्ध नाही (13) धारावी पुनर्विकास प्रकल्पातील महापालिकेच्या ताब्यातील जमिनी (अंदाजे 138 हेक्टरपेक्षा अधिक)- माहिती उपलब्ध नाही (14) एचडीआयएल टेनामेंट कुर्ला, एमएमआरडीए 2 हजार चौ. मी. जमीन – माहिती उपलब्ध नाही (15) कास्टिंग यार्ड, बीकेसी – माहिती उपलब्ध नाही (16) ऑर्थर सॉल्ट लँड, कांजूर – 120.5 एकर (17) जाम्स्प सॉल्ट लँड, कांजूर – 58.5 एकर (18) जनकिन्स सॉल्ट लँड – 76.9 एकर (19) अगर सुलेमनशा सॉल्ट लँड, माटुंगा – 253 हेक्टर (20) देवनार, बीएमसीला दिलेली कलेक्टर लँड – 90 एकर