
ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्र्यांनी वाजत गाजत या योजनेची जाहिरात केली. काम केले असेल तर खुशाल जाहिरात करावी. मात्र, सरकारने खोटं बोलताना थोड भान ठेवायला हवे. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याचे उघड झाले आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कामे न करताच खोटा प्रचार करण्याचे ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यांना जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण. ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिराती करतात. काम केलं असेल तर खुशाल जाहिरात करावी. परंतु खोटं बोलताना थोड भान ठेवायला हवं. देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी हरवलेले ज्येष्ठ नागरिक तांबे यांचा फोटो वापरल्याची ही बातमी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. या जाहिरातीमुळे तांबे कुटुंबीयांना किती मनस्ताप होत असेल? राज्यातील नागरिकांच्या फोटोंचा अवैधपणे वापर करणे हा किती मोठा गुन्हा आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया वरून व्यक्तीचे फोटो डाऊनलोड करणे आणि परवानगी शिवाय जाहिरातीत वापरणे ही गंभीर बाब आहे. महायुतीच्या योजना जश्या पोकळ आहे, तश्याच जाहिराती सुद्धा पोकळ आहे. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावा, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सत्ताधाऱ्यांना जाहिरातीचा किती सोस आहे याचे अजून एक उदाहरण.
ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणारी योजना सरकारने आणली. मुख्यमंत्री वाजत गाजत योजनेची जाहिराती करतात. काम केलं असेल तर खुशाल जाहिरात करावी. परंतु खोटं बोलताना थोड भान ठेवायला हवं.
देवदर्शन योजनेच्या जाहिरातीत… pic.twitter.com/BhlEK2PfQT
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 20, 2024
महायुती सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. या घोषणा जशा पोकळ आहे, तशाच त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातीही पोकळ आहे. काम न करताच खोटे फोटो वापरून प्रचार प्रसार करण्याचा ‘गुजरात मॉडेल’ मुख्यमंत्र्यांनी सोडावे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.