
चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका नागभीड तालुक्याला बसला आहे.
नागभीड तालुक्यातील बामणी ते कोटगाव हा पोचमार्ग वाहून गेला. तसेच शहरातील शिवनगर भागात पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील चिमूर या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तलावामुळे शहराच्या बाह्य भागाला पाण्याने वेढा घातला आहे.
जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासात येथे तब्बल 189.6 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर चंद्रपूर शहरात 26.4 मि. मी. पावसाची नोंद झाली. तर गेल्या 20 दिवसात चंद्रपुरात 451 मि. मी. पाऊसल पडला आहे. या पावसाने नदी-नाले तुडुंब झाले आहेत. आजही हवामान विभागाने चंद्रपूर जिल्हाला अरेंज अलर्ट आहे.
कुठल्या क्षणी इरई धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता
गेल्या महिन्याभरात चांगला पाऊस झाल्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली आहे. सध्या धरणातील पाण्याने 205750 मी. इतकी पातळी गाठलेली आहे, त्यामुळे असल्यामुळे इरई धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षण उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे इरई नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेच्या इशारा प्रशासनाने दिला आहे.
चंद्रपुरात संततधार, तर ब्रम्हपुरीत मुसळधार; 24 तासात 189 मिमी पावसाची नोंद, नदी-नाले तुडुंब, इरई धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडण्याची शक्यता, प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा pic.twitter.com/UOGdngZZyK
— Saamana (@SaamanaOnline) July 20, 2024
नागपूरमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी
दरम्यान, नागपूरमध्ये शुक्रवार रात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधीळ शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.