साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 जुलै ते शनिवार 27 जुलै 2024

>> नीलिमा प्रधान

मेष- अनाठायी खर्च टाळा

चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. नविन परिचयापासून सावध रहा. फसगत टाळा. अनाठायी खर्च टाळा. नोकरीच्या कामात चूक, गैरसमज होतील. धंद्यात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या मताशी सहमत व्हावे लागेल. मनाविरुद्ध निर्णयात सहभागी व्हावे लागेल. कौटुंबिक प्रश्न वाढतील.

शुभ दिनांक – 21, 22

वृषभ – आत्मविश्वास वाढेल

चंद्र, शुक्र प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. उत्साह, आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. नोकरीधंद्यात चांगला बदल घडेल. थोरामोठय़ांचा परिचय प्रेरणादायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळेल. योजना पूर्ण करा. कठीण, किचकट कामे मागे ठेवू नका.

शुभ दिनांक – 21, 23

मिथुन – प्रवासात सावध रहा

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला दगदग, तणाव जाणवेल. प्रवासात सावध रहा. कोणताही वाद विकोपाला जाऊ शकतो. कायदा, सुव्यवस्था पाळा. नोकरीतील कामे वाढतील. वरिष्ठांचे मत महत्त्वाचे ठरेल. धंद्यात लाभ होईल. चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवी लोकांना कमी लेखू नका. वादाचे प्रसंग येतील.

शुभ दिनांक – 25, 26

मिथुन – प्रवासात सावध रहा

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, बुध त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला दगदग, तणाव जाणवेल. प्रवासात सावध रहा. कोणताही वाद विकोपाला जाऊ शकतो. कायदा, सुव्यवस्था पाळा. नोकरीतील कामे वाढतील. वरिष्ठांचे मत महत्त्वाचे ठरेल. धंद्यात लाभ होईल. चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनुभवी लोकांना कमी लेखू नका. वादाचे प्रसंग येतील.

शुभ दिनांक – 25, 26

कर्क – विशेष यश मिळेल

सूर्य, प्लुटो प्रतियुती, सूर्य, मंगळ लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव. गुरूपौर्णिमेला गुरू महाराजांची कृपा होईल. तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. कला, साहित्यात विशेष यश मिळेल. जुना वाद मिटवून नव्याने सुरूवात करता येईल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. चर्चेत यश मिळेल.

शुभ दिनांक – 21, 26

सिंह- प्रकृतीची काळजी घ्या

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, शुक्र, शनि षडाष्टक योग. गोड बोलून हेतू साध्य करणार्या लोकांपासून सावध रहा. नात्यात, मैत्रीत गैरसमज उद्भावतील. प्रकृतीची काळजी घ्या. घरातील वृद्धांची चिंता राहील. नोकरी टिकवा. धंद्यात समतोल राखा. अतिरेक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोन ठेवा. अहंकार त्रासदायक ठरेल.

शुभ दिनांक – 23, 24

कन्या – चांगले निर्णय घ्याल

चंद्र, शुक्र प्रतियुती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. गुरूपौर्णिमा सर्वतोपरी लाभयदाक ठरेल. अनेक चांगले निर्णय घेता येतील. शब्द हे शस्त्र ठरतात हे लक्षात ठेवा. नोकरीधंद्यात जम बसेल. वरिष्ठ मदत करतील. थकबाकी मिळवा. नविन परिचय उत्साहवर्धक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. खरेदीविक्रीत लाभ होईल.

शुभ दिनांक – 21, 22

तूळ – वाद वाढवू नका

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. योग्य गुरू मिळणे सोपे नसते. प्रलोभनाला बळी पडू नका. मेहनत, प्रयत्न यामुळेच यश मिळते. नोकरीत प्रभाव पडेल. वाद वाढवू नका. धंद्यात गोड बोलणे योग्य ठरेल. गुंतवण्tाक योग्य प्रकारे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पुढे जाता येईल. लोकांच्या समस्या सोडवा. प्रतिष्ठा राखा.  घरगुती कामे होतील.

शुभ दिनांक – 23, 24

वृश्चिक – कर्जाचे काम होईल

सूर्य, मंगळ लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. योग्य दिशेने वाटचाल सुरू करता येईल. मनाप्रमाणे घटना घडतील. गुरूपौर्णिमा फलदायी, समाधान देणारी ठरेल. नोकरीत बढती, बदल होईल. धंद्यात वाढ, सुधारणा होईल. कर्जाचे काम होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रेरणादायक वातावरण राहील. क्षुल्लक तणाव सोडवाल.

शुभ दिनांक – 21, 22

धनु – योग्य नियोजन करा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग. चंद्र, बुध प्र्रतियुती. भावना व कर्तव्य यांची गल्लत करू नका. चुकीच्या गोष्टींच्या नादाला लागून नुकसान करून घेऊ नका. प्रत्येक दिवसाचे विचारपूर्वक नियोजन करा. जिद्दीने यश मिळेल. मन, शरीर याकडे लक्ष द्या. प्रकृती जपा. दौऱयात, प्रवासात काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मित्र, शत्रू ओळखणे कठीण ठरेल.

शुभ दिनांक – 21, 23

मकर – खरेदी विक्रीत लाभ

सूर्य, प्लुटो प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. गुरूपौर्णिमा फलदायी ठरेल. शब्दांना महत्त्व द्या. कायदा पाळून वक्तव्य करा. नोकरीधंद्यात सुधारणा, बढती मिळेल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. वसुली करा. खरेदीविक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे महत्त्व टिकवता येईल. नव्या योजना तयार करून आत्मविश्वासाने पुढे जा.

शुभ दिनांक – 23, 26

कुंभ – कायदा पाळा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, बुध प्रतियुती. कोणतीही आग्रही भूमिका घेणे योग्य ठरणार नाही. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत चूक टाळा. धंद्यात फसगत होईल. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. प्रवासात घाई नको. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. जवळच्या व्यक्ती दगाफटका करतील. मनस्ताप देणारी घटना घडेल.

शुभ दिनांक – 25, 26

मीन – प्रेरणादायक वातावरण

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. योग्य दिशेने वाटचाल होईल. रागाच्या भरात वक्तव्य करणे टाळा. नोकरीधंद्यात प्रगती, बदल होईल. थकबाकी मिळवा. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक वातावरण राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व, प्रभावी मुद्दे, मैत्रीपूर्ण संभाषण, अधिकारात नम्रता ठेवणे याचे कौतुक होईल.

शुभ दिनांक – 24, 25