
शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे देवशयनी आषाढी एकादशीनिमित्ताने प्रतिपंढरपूर वडाळा येथे विठ्ठल मंदिराशेजारी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, माजी महापौर महादेव देवळे, समाजसेविका रेश्मा गावकर यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरात आरोग्य सेनेचे डॉ. शशिकांत मोरे, डॉ. संतोष भानुशाली, डॉ. धनंजय दढेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेळी अमोल वंजारे, ज्योती भोसले, शिवाजी झोरे, सुप्रिया बंगलेकर, स्वप्नील शिनकर, अजिंक्य भोसले, प्रवीण ढवळे, मधुरा टमाटा, जयश्री चौधरी, छाया जामनिक, रजनी पाटील, लक्ष्मीप्रभा जाधव, हर्षला नाईक, दीपेश पटवर्धन, संतोष वंजारे, नंदकुमार बागवे, राजाराम झगडे, डॉ. प्रशांत भुईबर, एकनाथ अहिरे, देवशी राठोड, कोमल पालकर, वसुधा वाळूंज आदी उपस्थित होते.