
पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात झडती घेत पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली. दरम्यान, अधिकाऱयाने केलेल्या छळवणूकसंदर्भातील तक्रारीबाबत पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पुणे पोलिसांनी बजावले होते. मात्र, जबाब नोंदविण्यास त्या उपस्थित न राहिल्याने पुन्हा दुसऱयांदा समन्स बजाविण्यात आले आहे.
शेतकऱयाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप, अंगरक्षकासह सातजणांकिरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मनोरमा यांना महाड परिसरातून पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी पांडुरंग कोंडिबा पासलकर यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुह्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यासह पथकाने बाणेर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी मनोरमा यांना बंगल्यात आणले होते. त्यांच्या समक्ष बंगल्यातून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त केली. कारवाईच्या वेळी पोलिसांनी बंगल्याच्या परिसरात बंदोबस्त ठेवला होता. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह कर्मचाऱयांनी बंगल्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
पूजा खेडकर यांना दुसऱयांदा समन्स
पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिकसे यांनी छळ केल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी काशिम पोलिसांकडून हे प्रकरण पुणे पोलिसांकडे कर्ग केले आहे. प्रकरणाची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे. पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे जबाब नोंदकाका, असे समन्स बजाकिले होते. मात्र, खेडकर समन्स बजाकिल्यानंतर उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱयांदा समन्स बजाकिण्यात आले आहे.
म्हणून तिने केली तक्रार
प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकर यांनी खासगी आलिशान मोटारीला अंबर दिका, मोटारीकर महाराष्ट्र शासन अशी पाटी लाकली. तसेच कार्यालयासाठी स्कतंत्र दालन घेतले होते. प्रशिक्षणार्थी कालावधीत खेडेकर यांच्या बडेजाकपणाचे प्रकार उघडकीस आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयीन अधिकाऱयांनी तिची राज्य शासनाकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी सुहास दिकसे यांनी या प्रकरणाचा अहकाल राज्य सरकारकडे पाठकिला होता. त्यानंतर पूजा खेडकरांची काशिम येथे बदली केली. त्यानंतर पूजाने दिकसे यांच्याकिरोधात छळकणूक केल्याची तक्रार काशिम पोलिसांकडे केली होती.