
अमेरिकेत दक्षिण अमेरिकेतूनच नाही तर चोहोबाजूंनी अवैधरीत्या स्थलांतरित येत आहेत. तुरुंग, मनोरुग्णालयाच्या माध्यमातून ते अमेरिकेत प्रवेश करत आहेत. आज आपण जगासाठी डंपिंग ग्राऊंड बनलोय.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर आज पहिल्यांदा भाषण केले. त्यांनी विस्कॉन्सिन येथील पक्षाच्या अधिवेशनात समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अवैधरीत्या अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांवर निशाणा साधला. स्थलांतरितांची तुलना सिनेमांतील एलियन्सशी करतानाच ते तुमच्या नोकऱ्या बळकावतील, तुम्हाला खाऊन टाकतील असे ते म्हणाले. नोकऱ्या भुमिपुत्रांनाच मिळाल्या पाहिजेत, याकडे त्यांचा रोख दिसला.
न्यू यॉर्क मॅगझीनच्या कव्हरवर बायडेन, ट्रम्प अर्धनग्न
न्यू यॉर्क मॅगझीनने आरोग्य या विषयावर आधारित नवीन अंक प्रसिद्ध केला. या अंकाच्या कव्हर पेजवर बायडेन आणि ट्रम्प यांचे अर्धनग्न फोटो प्रसिद्ध करण्यात आले. दोन्ही नेत्यांच्या मेडिकल स्टेटसची तुलना या फोटोच्या माध्यमातून करण्यात आली. दरम्यान, मॅगझीनप्रकरणी संबंधित कंपनीला अमेरिकेत प्रचंड ट्रोल करण्यात येत असून दोन्ही नेत्यांच्या खासगी आयुष्याचे हे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.