मालाडमध्ये बांधकाम कोसळून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मालाड येथील अमेटी कन्स्ट्रक्शन या एसआरए प्रकल्पाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदकाम केलेल्या बाजूच्या जागेच्या भागात पावसामुळे खड्डा पडल्याने तेथे चार मजूर अडकून जखमी झाले. यातील एक मजूर पळून गेल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले, तर तीन जखमी मजुरांपैकी एका मजुराचा मृत्यू झाला असून दोघांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मालाड येथील समुद्र बारच्या मागे, वेस्टर्न एक्प्रेस हायवेवर अमेटी कन्स्ट्रक्शनचे एसआरए प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकाम सुरू असल्याने खोदकाम करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शुक्रवारी खोदकामाच्या बाजूच्या भागात खड्डा पडला व त्यात चार मजूर अडकून पडले. अडकलेल्या या मजुरांची सुटका करण्यात आली. मात्र खड्डय़ात अडकल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रेमचंद जयस्वाल (39) यांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या दोघांना ट्रामा रुग्णालयातील उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर एक मजूर जखमी झाला.