राष्ट्रवादीचा मिंधे सरकारविरुद्ध एल्गार, ‘महायुतीचे काळे कारनामे’ घरोघरी पोहोचवणार 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मिंधे सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या, योजनांच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार करणाऱया महायुती सरकारचे काळे कारनामे घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणाऱया ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात अले.
– जयंत पाटील म्हणाले की, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कँपेन लाँच करत आहोत. त्यात लोक त्यांची मते मांडू शकतात.  19 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत हे पँपेन लागू राहील, असे त्यांनी सांगितले.
–  राज्यात 25 नेते असे आहेत जे आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये गेले अन् कारवाई बंद झाली. ताजे उदाहरण रवींद्र वायकर आहेत, म्हणजे भाजपमध्ये गेले की चौकशी काही होत नाही. आता पूजा खेडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या सुटू शकतात असे माझ्या वाचणात आले, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.