शिरीष कणेकर यांच्या ‘थँक-यू’ पुस्तकाचे 25 जुलैला प्रकाशन

दिवंगत लेखक शिरीष कणेकर यांनी लिहिलेल्या ‘थँक-यू’ या पुस्तकाचे प्रकाशन 25 जुलै रोजी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. हा कार्यक्रम माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिराच्या तालीम हॉलमध्ये सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होईल. या वेळी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन दिलीप ठाकूर करतील. कार्यक्रमाचे निवेदन शोभा नाखरे करणार आहेत. ‘थँक-यू’ पुस्तक नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. शिरीष कणेकर यांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारती कणेकर, श्वेता कणेकर-सुळे आणि नवचैतन्य प्रकाशनाचे शरद मराठे यांनी केले आहे.