![chandrapur man murder](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/chandrapur-man-murder-696x447.jpg)
घरगुती वादातून पत्नीने पतीवर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. अमोल पोडे असे मयत पतीचे नाव आहे. लक्ष्मी पोडे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
चंद्रपूर शहरालगत असलेल्या नांदगाव पोडे गावात पोडे दाम्पत्य राहत होते. पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की पत्नीने धारदार शस्त्राने पतीवर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
हत्येची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. आरोपी पत्नीलाही अटक केली आहे. दरम्यान, हत्येची माहिती मिळताच गावकऱ्यांनीही घटनास्थळी एकच गर्दी केली होती.