
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. आजच्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या बैठका पार पडल्या. मतदारसंघांच्या आढाव्याबरोबरच निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पुणे येथे पार पडली. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे वाढलेली जबाबदारी,मतदारसंघांमधील परिस्थिती, मतदारांचा कल आदी मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
– अजित पवार गटानेही आज पुण्यामध्ये बैठक घेऊन चर्चा केली. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावली होती. नव्या शहर अध्यक्षपदासाठी इच्छुकांची यादी बनवली तसेच आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱयांच्या समस्या ऐपून घेणे यासंदर्भात अजित पवारांनी सूचना दिल्या.
– भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.