
आठ देशांचा समावेश असलेली महिला आशियाई क्रिकेट स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होतेय. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पारंपारिक वट्टर प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. स्पर्धेची उद्घाटनीय लढत युएई विरुद्ध नेपाळ यांच्यात रंगेल. नवव्या महिला आशियाई स्पर्धेत चार-चार संघाचे दोन गट पाडण्यात आले असून अ गटात हिंदुस्थान, नेपाळ, पाकिस्तान आणि युएई तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि थायलंड हे संघ भिडतील. या स्पर्धेत आठपैकी सातवेळा बाजी हिंदुस्थानी संघानेच मारली आहे. यंदाची जेतेपदाचे अष्टक पूर्ण करण्यासाठीच हरमीतकाwरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिला संघ उतरणार आहे. या स्पर्धेत एपंदर 15 सामने खेळले जाणार असून या स्पर्धेचे सर्व सामने डम्बुला स्टेडियमवरच खेळविले जाणार आहे. अ आणि ब गटातील अव्वल दोन संघ 26 जुलैला उपांत्य लढत खेळतील आणि 28 जुलैला अंतिम सामना रंगेल.