
मध्य रेल्वेवर 20 आणि 21 जुलै मध्यरात्री साडे बारा ते पहाटे साडे चार वाजेपर्यंत चार तासांचा विशेष ब्लॉक पाळण्यात येणार आहे. कर्नाक बंदर ब्रीजडे गर्डर लाँचिंग ब्लॉकच्या कामासाठी विशेष पोर्टल बूमच्या उभारणीसाठी आणि 800 एमटी एअरड्रॉप रोड क्रेनद्वारे जुने अँकर हटवण्यासाठी ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) द्वारे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
चार तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान भायखळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गिकेवर (सातव्या मार्गासह आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेकसह) ब्लॉक असणार आहे. तसेच वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन्स (सातवी लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेक दोनसह) ब्लॉक असणार आहे.
ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या खालील प्रमाणे चालवल्या जाणाऱ्या आहेत.
- ब्लॉक कालावधीत मेन लाईनवर भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच हार्बर लाईनवर वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपनगरीय सेवा बंद असणार आहे.
- मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील.
- हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानका पर्यंत/पासून शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या केल्या जातील.
मुख्य मार्गिकेवर चालवण्यात येणाऱ्या गाड्या
• डाऊन स्लो लाईन N1 शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00:14 वाजता सुटेल आणि कसारा येथे 03:00 वाजता पोहचेल.
• अप स्लो लाईन S 52 शेवटची लोकल कल्याण येथून 22:34 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 00:06 वाजता पोहचेल.
• डाउन जलद लाईन S3 पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 04:47 वाजता सुटेल आणि कर्जत येथे 06:07 वाजता पोहचेल.
• अप धीमी लाईन T2 ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ठाणे येथून पहिली लोकल 04:00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 04:56 वाजता पोहचेल.
हार्बर मार्गावर पुढील प्रमाणे गाड्या चालवल्या जातील
• डाउन हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून शेवटची लोकल PL1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00:13 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 01:33 वाजता पोहचेल.
• शेवटची लोकल PL 194 पनवेल अप हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी 22:46 वाजता सुटेल आणि 00:05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.
• डाउन हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल PL 9 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 04:52 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 06:12 वाजता पोहचेल.
• अप हार्बर लाईन B2 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पहिली वांद्रे लोकल 04:17 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 04:48 पोहचेल.
या ब्लॉक दरम्यान खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या दादर स्टेशन पर्यंत चालवल्या जाणाऱ्या आहेत.
12870 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस
11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
12052 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस
22120 मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस
11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल