यवतमाळ येथे काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांची तीव्र निदर्शने

>> प्रसाद नायगावकर

काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने यवतमाळच्या दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली असून केंद्र सरकारचा यावेळी धिक्कार करण्यात आला. अजूनही दहशतवादी संघटना आपले कार्य काश्मीरमध्ये करीत आहे हे रोखण्यामध्ये सरकारला अपयश आले असा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे

गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ज्यांचे प्राण गेलेत त्या कुटुंबाच्या प्रती संवेदना व्यक्त करीत शिवसेनेने आज सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली आणि यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी घोषणा देखील दिल्यात आंतकवाद नहीं चलेंगा, नही चलेगा, अशा घोषणा देत सरकारलाही धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, सागर पुरी संपर्कप्रमुख, संपर्क संघटक पश्चिम विदर्भ प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, उपजिल्हाप्रमुख संजय रंगे, तालुकाप्रमुख अतुल गुल्हाने, शहर प्रमुख चेतन शिरसाट, याशिवाय कल्पनाताई दरवाई महिला आघाडी जिल्हा संघटिका, अमोल धोपेकर युवासेना प्रमुख, अंजली गिरी महिला तालुका संघटिका, राजू धोटे चंद्रकांत उडाके गजानन पाटील संदीप सरोदे संतोष सरोदे, संतोष चव्हाण विष्णू राठोड निलेश लडके गिरीधर कळंबे हितेश राठोड यांच्यासह इतर अनेक शिवसैनिक उपस्थित होते.