सारा तेंडुलकर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार? व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातानाचा व्हिडीओ व्हायरल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडूलकर तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकसाठी कायम चर्चेत असते. सध्या साराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ती प्रचंड सुंदर दिसत असून चाहत्यांमध्ये तिच्या बॉलीवूडमध्ये पदार्पणाबाबत चर्चा रंगली आहे. त्या व्हिडीओत सारा स्टनिंग निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

पॅपराजींकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सारा तेंडुलकर बाहेर  असलेल्या व्हॅनिटी वॅन मध्ये जाताना दिसत आहे, तो एका स्टुडीओच्या बाहेरचे आहे. तिथे ती बाहेर आल्यावर पॅपराजींनी हाय करताना दिसत आहे. मात्र ती नेमकी शुटींग कशासाठी करत आहे त्याबाबत कळलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

इन्संट बॉलीवूडने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी बदामाचे इमोजी पाठवले. एका यूजरने लिहीले की, ती फार गॉर्जिअस आणि सुंदर दिसत आहे. ऑसम लवली. दुसऱ्या यूजरने लिहीले की, प्रिंसेस आणि तीन बदामाचे इमोजी शेअर केले आहेत. अन्य एकाने लिहीले की, सुंदर.

काही दिवसांपूर्वी सारा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरु होती. टेलीचक्कर द्वारा दावा करण्यात आला होता की, ती बॉलीवूडमध्ये अभिनयात करिअर बनविण्याची तिची इच्छा आहे.