मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांवरही परिणाम दिसून आला.
कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवसांत 200 एमएम ते 500 एमएम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईला आज येलो, ठाणे-पालघरला ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने कुलाबा, फोर्ट, मलबार हिल, चर्चगेट आणि जवळपासच्या इतर भागात पुढील 2 तासांत मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिवसभरात एकूण पाऊस 50-60 मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश आहेत. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.