
इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याच्या नादात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या 27 वर्षीय तरूणीला आपला जीव गमावावा लागलाय. ही घटना माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धबधब्यावर घडली आहे. अन्वी कामदार असे तिचं नाव असून ती मुंबईतून रील बनवायला आपल्या मैत्रीणींसह समाज माध्यमांवर प्रसिदध असलेल्या माणगाव तालुक्यातील कुंभे धबधब्यावर आली होती.
मुंबई माटुंगा येथे राहणारी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अन्वी कामदारचे अडीच लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया साईटवरती चांगले रिल्स टाकून आपल्या फाॅलोवर्सना माहिती देणे हा छंद तिने जोपासला होता. त्यासाठी जगभरातील विविध पर्यटन ठिकाणांना ती भेट देत असे.
सोशल माध्यमातूनच माहिती मिळालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कुंभे धबधबा येथे अन्वी कामदार व तिचे अन्य काही सहकारी मंगळवारी आले होते. या ठिकाणी असणाऱ्या उंच कठड्यावर निसरड्या पाऊल वाटेने पुढे जात अन्वी रिल बनविण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत कोसळली. तिच्या सहकारी मित्रांनी ही कल्पना माणगाव पोलिसांना दिल्या नंतर माणगाव, कोलाड, महाड ङपरीसरातील अनेक बचाव पथके यांच्यासह पोलीस यंत्रणा कुंभे धबधब्यावर दाखल झाली.
प्रयत्नांची शिकस्त करून या पथकांनी खोल दरीमधून महतप्रयासाने अन्वी पर्यंत पोहचण्याचा यशस्वी प्रयत्न करून दरीतून तीला बाहेर काढली मात्र तिला वरती आणेपर्यंत दुर्दैवाने तीचा मृत्यू झाला.
.
View this post on Instagram