
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील जनक पॅलेस परिसरातील एका वाहनातील गुटख्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. यातसुमारे 7 लाखाचा गुटखा तर पाच लाख रुपये किमतीची मारुती इको कार असे एकूण अंदाजे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात वाहन चालक गौरव पखाले याला ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार शहरातील पांढरकवडा रोडवरील जनक पॅलेस परिसरात एका वाहना‘ध्ये गुटखा असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात तब्बल सहा लाख 45 हजार 857 रुपयांचा सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी लगेच वाहन चालक गौरव पखाले (33) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. या‘ध्ये सुगंधित तंबाखू, गुटखा आणि वाहन, असे मिळून 11 लाख 45 हजार 857 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, सुरेश झोटींग, गजानन कोरडे, निरल प्रधान, अन्सार बेग, विकास क‘नर, प्रवीण ऊईके, तसेच महिला पोलीस पोलिस जयश्री चव्हाण यांनी केली.