
गुंतवणूक केल्यास 10 ते 100 टक्के नफा देऊ असे सांगून ठगाने व्यावसायिकाला 9 लाख रुपयांना चुना लावला आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार व्यावसायिक असून तो मालाड येथे राहतो. 14 दिवसांपूर्वी त्याला मोबाईलमध्ये एक लिंक आली. ती लिंक त्याने मोबाईलमध्ये सेव्ह केली. त्यानंतर त्याने विश्वास ठेवून सुरुवातीला 1 लाख रुपये एका बँक खात्यात ट्रान्सफर केले. तेव्हा त्यांना 10 हजार 184 रुपये नफा दाखवला गेला. व्यावसायिक हे पैसे गुंतवत गेले तसे त्याना वाढता नफा दाखवला जाऊ लागला. 10 जुलैला त्याने आयपीओ आणि शेअरविक्रीच्या माध्यमातून नफ्याचा आमीष दाखवले. शेअरविक्रीच्या मोबदल्यात त्यांना 10 लाख 58 हजार रुपये येणे बाकी होते. त्यांना एक लिंक पाठवून 15000 शेअर देण्यात आले असे भासवले. मात्र शेअरची किमत जास्त होती.