विशाळगड हिंसाचार; कोल्हापुरात इंडिया आघाडीची आज शिवशाहू सद्भावना रॅली

विशाळगड, गजापूर-मुसलमानवाडी येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करीत शांततेचे आवाहन करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी व येथील सर्व शाहूप्रेमी जनतेच्या वतीने उद्या दुपारी चार वाजता राजर्षी शाहू समाधिस्थळ ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी ‘शिवशाहू सद्भावना रॅली’ काढण्यात येणार आहे.

नागरिकांनी जात, धर्म, पंथ, संघटना, गट-तट विसरून शाहू महाराजांच्या विचारासाठी एकत्र येऊन रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केले आहे.