उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये कुरबुर सुरू झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री आणि मागासवर्गीयांचे प्रभावी नेते केशवप्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ विरोधात दंड थोपटले आहेत. सरकारपेक्षा कार्यकर्ते महत्त्वाचे म्हणत केशवप्रसाद मौर्य यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आवाहनानंतरही त्यांनी आपली भूमिका बदललेली नाही. ते सातत्याने योगींविरोधात वक्तव्ये करत आहेत. प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनीही राजीनामा द्यायची तयारी दाखवली आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांना म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने भेट दिली. राज्यातील सरकार आणि पक्ष संघटना यांच्यातील सध्याच्या पक्षांतर्गत वादाचा अहवाल चौधरी यांनी त्यांना दिला.