देवेंद्र फडणवीस अजितदादांचे हेलिकॉप्टर भरकटले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोलीत हेलिका@प्टर प्रवासात सुदैवाने बचावले. गडचिरोलीतील विकासकामांच्या उद्घाटनासाठी जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिका@प्टर भरकटले होते. परंतु पायलटने प्रसंगावधान दाखवत ते जमिनीवर सुरक्षित उतरवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गडचिरोली जिह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात लिमिटेड या आयर्न स्पोंज उत्पादक कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरहून हेलिका@प्टरने गडचिरोलीला निघाले होते. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हेसुद्धा होते. हवामान अचानक बिघडल्याने त्यांचे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले. त्यामुळे हेलिका@प्टरमधील सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. पायलटने मोठय़ा काwशल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निŠश्वास सोडला.

माझ्या तर पोटातच गोळा आला होता… – अजित पवार

भूमिपूजनानंतर झालेल्या सोहळ्य़ात अजित पवार यांनी हेलिकॉप्टर कसे भरकटले आणि त्यानंतर आपली काय अवस्था झाली याचा धक्कादायक अनुभव अत्यंत गमतीशीरपणे सांगितला. अजित पवार म्हणाले की, हेलिका@प्टरमध्ये बसत असताना बरं वाटलं. पण ते भरकटून ढगात शिरल्यावर माझ्या तर पोटातच गोळा आला होता. सगळीकडे ढगच ढग दिसत होते. फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले होते. मी म्हटलं जरा बाहेर बघा, पुठं झाड दिसेनासं पुठं काहीच दिसेनासं जमीनही दिसेनासं आपण ढगात चाललो आहोत. ते ऐकून फडणवीस महाराज मला म्हणाले, काही काळजी करू नका मी हेलिका@प्टर किंवा विमानात असताना माझे आतापर्यंत असे सहा अपघात झाले आहेत. तरी मला काहीच झालं नाही. तुम्हालाही काही होणार नाही.’ अजितदादांचा हा किस्सा ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. आज आषाढी एकादशी असल्यामुळे मी सारखं पांडुरंग.. पांडुरंग.. पांडुरंग करत इथवर प्रवास केला, असे अजित पवार म्हणताच सर्वजण हसून हसून लोटपोट झाले.