मिंधे आणि फडणवीसांच्या राजवटीत महाराष्ट्रात बेकारीचा भस्मासुर, 2200 जागांसाठी 25 हजार बेरोजगारांची झुंबड

मिंधे आणि फडणवीसांच्या राजवटीत महाराष्ट्रात बेकारीचा भस्मासुर झाला असून त्याचे भीषण दृश्य मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर मंगळवारी पाहायला मिळाले. विमानतळावरील लोडर भरतीसाठी अक्षरशः इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली. अवघ्या 2216 जागांसाठी तब्बल 25 हजारांवर उमेदवार आल्याने रेटारेटी आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. एअर इंडिया व्यवस्थापनाकडून उमेदवारांसाठी कोणतीही सुविधा केली नसल्याने हजारो उमेदवारांचे हाल झाले. त्यामुळे राज्य आणि देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राज्यासह संपूर्ण देशात बेरोजगारी प्रचंड वाढल्याने कोणत्याही ठिकाणी भरती जाहीर झाल्यास हजारो उमेदवारांची झुंबड उडत आहे. हीच स्थिती एअर इंडियाच्या भरतीदरम्यान पुन्हा एकदा निर्माण झाली. मंगळवारी मुंबईत विमानतळ लोडरच्या 2216 जागांसाठी 25 हजारांहून अधिक उमेदवार मुलाखतीसाठी पोहोचले. त्यामुळे मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एअर इंडियाच्या कर्मचाऱयांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. उमेदवारांच्या गर्दीचे अनेक पह्टो आणि व्हिडीओही समोर आले आहेत, ज्यामध्ये नोकरीसाठी येणाऱया तरुणांची मोठी गर्दी दिसत आहे. फॉर्म काऊंटरवर पोहोचण्यासाठी उमेदवार एकमेकांशी धडपड करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वी गुजरातमधील भरूच जिह्यातील एका खासगी पंपनीत केवळ 10 पदांसाठी सुमारे 1800 उमेदवार उपस्थित होते. गर्दी एवढी होती की, कार्यालयाच्या एंट्री गेटच्या उतारावरील रेलिंग कोसळले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या गुजरात मॉडेलचा पर्दाफाश केल्याचे म्हटले होते. सत्ताधारी पक्ष बेरोजगारीचे हे मॉडेल संपूर्ण देशात राबवत आहे, असा आरोप केला जात आहे.

n राजस्थानच्या अलवर येथून मुंबईत आलेल्या आणखी एका उमेदवाराने सांगितले की, त्याच्याकडे एम.का@म.ची पदवी आहे. तो म्हणाला, ‘मीही सरकारी नोकरीची तयारी करतोय, मला पुणीतरी सांगितलं की इथे पगार चांगला आहे म्हणून मी इंटरह्यूला आलो आहे.’

तासन्तास रांग, ना अन्न ना पाणी

भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. या ठिकाणी व्यवस्थापनाकडून अन्न-पाणी अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे अनेकांची प्रपृती ढासळू लागली. बुलढाणा जिह्यातील प्रथमेश्वरने सांगितले की, लोडरच्या नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी 400 किलोमीटरचा प्रवास करून इथे पोहोचलो. मी शिकाऊ पदासाठी अर्ज करण्यासाठी आलो आहे. मी बीबीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पण नोकरी लागली तर तो अभ्यास सोडेल. सरकारने रोजगाराच्या संधी वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

25 ते 30 हजार पगारासाठी धडपड

– विमानतळावर लोडर म्हणून भरती केलेले कर्मचारी विमानात सामान चढवणे आणि उतरवणे तसेच बॅगेज बेल्ट आणि रॅम्प ट्रक्टर चालविण्याचे काम करतात. एका विमानाला सामान, माल आणि खाद्यपदार्थ वाहून नेण्यासाठी किमान पाच लोडर लागतात.

– विमानतळ लोडरचा पगार 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना असतो. तथापि, बहुतेक लोडर जादा काम करून 30 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतात. लोडरच्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता मूलभूत आहे तर उमेदवार शारीरिकदृष्टय़ा मजबूत असावा लागतो.

भाजपने तरुणांचं वाटोळं केलं
आपल्या देशातील रोजगाराची अवस्था दयनीय आहे. 600 नोकऱयांसाठी 25 हजार जण नोकरी शोधत आले. भाजपने आपल्या देशातील तरुणांचं वाटोळं केलं आहे. आपल्या तरुणांना रोजगारापासून दूर ठेवून फूट पाडण्याच्या कामांमध्ये गुंतवून ठेवण्याची त्यांची खेळी आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.