Breaking : गडचिरोलीत जवानांना मोठे यश, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

naxal-attack
फाईल फोटो

गडचिरोली जिल्ह्यातील छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत दोन जवान देखील जखमी झाले आहे. या नक्षलवाद्यांकडून सात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यात तीन एके 47 रायफल्स, 2 आयएनएसएएस, 1 कार्बाईन, 1 एसएलआर यांचा समावेशन आहे. दरम्यान सुरजागड इस्पात या खाजगी कंपनीच्या पायाभरणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीअजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत हे दक्षिण गडचिरोलीच्या याच परिसरात उपस्थित असताना ही चकमक झाली.

बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर C60 पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पाटील यांना हेलिकॉप्टरने कांकेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आले.

एका नक्षलवाद्याची ओळख पटली

मृत नक्षलवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम असून इतर नक्षलवाद्यांचा ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.