दुबईच्या राजकुमारीने दिला इंस्टाग्रामवरुन तलाक, नेमकं काय आहे हे प्रकरण ते वाचा

फोनवरुन, सोशल मीडियावरुन तलाक दिल्याची अनेक प्रकरणं वाचली, पाहिली असतील. आता चक्क दुबईची राजकुमारी शेखा माहरा यांनी पती शेख माना याला थेट इंस्टाग्रामवरुन तलाक दिला आहे. एवढेच नाही या तलाकबरोबर तिने त्याला चांगलेच सुनावले देखिल आहे. सध्या त्यांच्या या तलाकची सगळीकडे चचा सुरु आहे.

राजकुमारी शेखा माहरा यांनी मुस्लीम परंपरेचे पालन करत या तलाकची घोषणा केली आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर लिहीले आहे की, प्रिय पती, तुम्ही तुमच्या अन्य साथीदारांसोबत व्यस्त आहात, त्यामुळे मी तलाकची घोषणा करते. मी तुम्हाला तलाक देत आहे, मी तुम्हाला तलाक देत आहे, मी तुम्हाला तलाक देत आहे. स्वत:ची काळजी घ्या. तुमची पूर्वाश्रमीची पत्नी. सध्या त्यांचे ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमधून स्पष्ट होत आहे की, राजकुमारी शेखा माहराचे पती शेख माना यांच्या आयुष्यात अनेक महिला आहेत. त्यांच्यासोबत ते व्यस्त आहेत.

राजकुमारीच्या या निर्णयाने त्यांचे चाहते मात्र आनंदी झाले आहेत. तर काहींनी त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाचे कारणही विचारले आहे. तर एका युजरने लिहीले की तलाक तर नवऱ्याकडून होतो ना? तर अन्य एका यूजरने लिहीले की, तुमच्या आनंदाशी तोडगा होऊ शकत नाही. शेखा माहरा यांनी आपल्या तलाकची घोषणा तेव्हा केली जेव्हा त्यांनी नुकताच बाळाला जन्म दिला, त्यांनी आपल्या पतीचे सर्व फोटो हटवले आहेत. ज्यात त्यांच्या लग्नाचे फोटोही होते. एवढेच नागी तर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.