‘सब का साथ सब का विकास’ नाही! तर आता…; भाजप नेत्यानेच बदलली मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सब का साथ सब का विकास ही घोषणा दिली. दरम्यान मोदींकडून फक्त त्यांच्या मित्रांचा व भाजपमध्ये येणाऱ्यांचा विकास केला जातो असा आरोप विरोधकांकडून नेहमी होत असतो. विरोधकांचा हा आरोप खरा करणारे वक्तव्य भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केले आहे. त्यांनी चक्क भाजपच्या तर कार्यकारिणीच्या बैठकीत “जो हमारे साथ, हम उनके साथ” असा नारा दिला. त्यावरून सध्या भाजपवर टीका होत आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ही घोषणा दिली आहे. ”आपल्या पक्षातील नेते सबका साथ, सबका विकास वैगरे बोलत असतात. पण यापुढे आता मी ही घोषणा देणार नाही. आता जो आपल्या बरोबर असेल, त्याच्याबरोबरच आपण राहणार असे म्हटले आहे. तसेच त्यांनी अल्पसंख्याक मोर्चाही बरखास्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.