
2022 चे गोवा आयर्न मॅन तसेच लाडाख येथील अतिउंच व अवघड अशी खरदुंग चॅलेंज मॅरेथॉन सप्टेंबर 2023 रोजी पुर्ण करणारे डॉ. पांडुरंग सानप यांनी आषाढी एकादशी निमित्त जामखेड ते पंढरपूर असे 140 किलोमीटर अंतर पायी धावत अठरा तासात यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यामुळे त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामखेड येथील सायकलपटू डॉ पांडुरंग सानप हे गोवा आयर्न मॅन 2022 ही स्पर्धा गोवा येथील मिरामार बीचवर 13 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाली, यामध्ये जवळपास 27 देशातील खेळाडू आले होते आणि यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास शंभर लोक होते. पूर्ण स्पर्धेमध्ये तेराशे लोकांचा सहभाग होता आणि यामध्ये 700 लोकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. डॉ सानप यांनी ही स्पर्धा सात तास 42 मिनिटांमध्ये पूर्ण केली यासाठी एकूण वेळ हा आठ तास तीस मिनिटांचा असतो . यामध्ये समुद्रामध्ये स्विमिंग 1.9 किलोमीटर असते त्यानंतर सायकलिंग 90 किलोमीटर व त्यानंतर रनिंग 21 किलोमीटर हे सर्व एका पाठोपाठ एक पूर्ण करायचे असते, तर ती मी यशस्वीरित्या पूर्ण केली तसेच जामखेड येथील भास्कर भोरे यांनी पण ती यशस्वीरित्या पूर्ण केली.
तसेच डॉक्टर सानप यांनी पूर्ण केली लाडाख येथील अतिउंच व अवघड अशी खरं दुंगला चॅलेंज मॅरेथॉन 8 सप्टेंबर 2023 रोजी लडाख येथील अति उंच अशा 17 600 फूट व कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी 72 किलोमीटरची लडाख येथील खरदुंगला चॅलेंज मॅरेथॉन त्यांनी वेळेआधी पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये जगभरातून 259 लोक स्पर्धक आले होते त्यापैकी 200 एक लोकांनी ही स्पर्धा पूर्ण केली 59 लोकांनी हे स्पर्धा पूर्ण करण्याआधी सोडून दिले कारण तिथे कमी ऑक्सिजनमुळे धावणे अशक्य होत होते आणि 14 तासांमध्ये हे अंतर पूर्ण करायचे होते.
पण ऑक्सिजन वर कमी असल्यामुळे हे करणे बऱ्याच जणाला शक्य झाले नाही. जगभरातून आलेल्या सर्व स्पर्धकांपैकी डॉक्टर सानप यांनी स्पर्धा अत्यंत निर्धारित वेळेमध्ये पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामखेड वरून डॉ पांडुरंग सानप, प्राचार्य आप्पा शिरसाट व उमेश घोडेस्वार यांनी जामखेड वरून पायी चालत पंढरपूर येथे चालले होते यातील पांडुरंग सानप यांनी हे अंतर अठरा तासात पूर्ण केले आहे. शिरसाठ व घोडेस्वार यांनीही शर्यत पुर्ण केली.