
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा हुकूमशहा किंम जॉन ऊन त्याच्या विक्षिप्त आणि सणकी स्वभावामुळे ओळखला जातो. अमेरिकेचा विरोध झुगारून त्याने अणुचाचण्या सुरू ठेवल्यानेही तो जगभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. तसेच त्याच्या प्रकृतीबाबतही अनेक वावड्या उठत असतात. आता किंम जॉन ऊनने विक्षिप्ततेमुळे क्रूरतेचा कळस गाठला आहे. एका क्षुल्लक कारणावरून त्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेने जगभरात संताप व्यक्त होत आहे.
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील वैर सगळ्यांनाच माहिती आहे. उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. हुकूमशहा किम जॉग उनच्या सरकारने कोरियनड्रामा बघितल्याच्या कारणावरून 30 विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा केली आहे. किम जॉग उनच्या आदेशावरुन 30 विद्यार्थ्यांना भरचौकात गोळ्या घालण्यात आल्या आहेत. कोरियन वृत्तपत्र ‘जोंगआंग डेली’ने याबाबतचे वृत्त दिल्याने ही घटना जगासमोर आली आहे.
दक्षिण कोरियाशी वैर असल्याने हुकूमशहा किंग जॉग उनने उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामा बघण्यास बंदी घातली आहे. तसेच, उत्तर कोरियात यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी आहे. चित्रपट आणि नाटक तसेच गाणी ऐकण्यावरही बंदी आहे. दक्षिण कोरियन नाटक पाहिल्याच्या आरोपाखाली 30 विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 30 शालेय विद्यार्थ्यांना भर चौकात गोळ्या घालण्यात आल्या आहेत. ते सर्व विद्यार्थी 19 वर्षाखालील होते, अशी माहिती मिळाली आहे.