
छगन भुजबळ हा अतिशय बेइमान माणूस आहे. कोणत्याही जातीत असा माणूस जन्माला येऊ नये. भुजबळांना राज्य अस्थिर करायचे आहे. गोरगरीब मराठय़ांचे आरक्षणामुळे होणारे कल्याण त्यांना बघवत नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे-पाटील यांनी केला. 20 जुलैपासून कठोर उपोषण करण्याचा निर्धारही आंतरवाली सराटी येथे त्यांनी या वेळी बोलून दाखवला.
सरकार कितीही भुजबळांना कडेवर घेऊन नाचले तरी आम्ही आरक्षण ओबीसीतूनच घेणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. छगन भुजबळ आज अचानक शरद पवार यांना भेटायला गेले. यासंदर्भात विचारले असता त्यांनी भुजबळ हा अतिशय बेइमान माणूस असल्याचा टोला लगावला.