मोबाईल रिचार्ज नंतर आता ऑनलाईन जेवण ऑर्डर करणेही महाग झाले आहे. स्विगी, झोमाटोवरून ऑनलाईन जेवण मागवणे आता खवय्यांना महाग पडणार आहे. फूड डिलिव्हरी कंपन्यांनी प्लॅटफॉर्म चार्जेस वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
एअरटेल, जिओ आणि वी या मोबाईल रिचार्ज कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच रिचार्ज चे पैसे वाढवून ग्राहकांना झटका दिला. आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनीही डिलिव्हरी चार्जेसमध्ये 20 टक्के वाढ केली आहे. गेल्यावर्षी पासून यात आतापर्यंत 300 टक्के वाढ झाली आहे. स्विगी, झोमाटोने प्रत्येक ऑनलाईन ऑर्डर वर 6 रुपये प्लेटफॉर्म फी आकरण्यास सुरुवात केली आहे. आधी 5 रुपये आकारण्यात येत होते. दिल्ली आणि बेंगलुरू मध्ये प्लेटफॉर्म फी आकारण्यात सुरुवात झाली आहे. ही फी डिलीवरी, रेस्टोरेंट, हैंडलिंग चार्ज आणि जी एस टी पेक्षा वेगळी आहे. एप्रिल मध्येच झोमाटोने प्लेटफॉर्म फी मध्ये 25 टक्के वाढ करून 5 रुपये केली होती. आता 2 महिन्यातच यात 1 रुपया वाढ करण्यात आली आहे.
कंपन्यांच्या नफ्यात वाढ
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झोमाटोने प्लॅटफॉर्म चार्ज 2 रुपये आकारण्यास सुरुवात केली होती. यात नंतर वाढ करून 5 रुपये करण्यात आले. प्लॅटफॉर्म चार्ज वाढविल्यामुळे फूड डिलिव्हरी कंपन्यांना आता जास्त नफा मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार यामुळे फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या नफ्यात तब्बल 1.25 ते 1.50 कोटी रुपये दररोजचा नफा मिळणार आहे.
स्विगी आणि झोमॅटोने वाढवले प्लॅटफॉर्म चार्जेस डिलिव्हरी चार्जेसमध्ये 20 टक्के वाढ केलीय. वर्षभरात आतापर्यंत 300 टक्के वाढ झाली आहे.