
सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून तरुणपिढी तणावामुळे टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उडी घेत एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. पोलीसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलचा तपास केला असता तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मरीन ड्राईव्ह येथे सोमवारी एक तरुणी बुडाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलीस आणि अग्निशमन पथकाने समुद्रातून तरुणीला बाहेर काढले. तिला तत्काळ जी.टी. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तरुणीने उडी मारण्यापूर्वी तिची बॅग बाहेर सोडली होती. तिच्या आयडी कार्डवरुन तिची ओळख ममता कदम अशी पटली आहे. ती अंधेरी येथे राहत असून एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कामाला होती. सकाळी कामावर निघते असे सांगून ती घरातून बाहेर पडली ती घरी परतलीच नाही.
तरुणीच्या मोबाईलच्या चॅटींगवरुन वैयक्तिक कारणावरुन तिने आत्महत्या केल्याचे सप्ष्ट झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.