शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा इतिहास अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ही मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी माहिती व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी दिली.

लातूर येथील पत्रकार भवनमध्ये यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत आष्टीकर यांनी सांगितले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जगभरातील लोकांमध्ये आस्था आहे. जार्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या चार्लस हॉस यांनी लिहिलेल्या ‘तुलनात्मक राजकारण याच्या पाचव्या आवृत्तीमध्ये’ प्रकरण 12 मध्ये हिंदुस्थान हा विषय आहे. हिंदुस्थानातील राजकीय, आर्थिक विवेचन यामध्ये करण्यात आले आहे. काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षासोबत केवळ महाराष्ट्रातील शिवसेना या प्रादेशिक पक्षाचा समावेश या विषयात करण्यात आला आहे.

हिंदुस्थानातील महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र समाविष्ट आहेत. तर अर्थतज्ञ म्हणून माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यामध्ये स्थान दिलेले आहे. शिवसेनेच्या कार्याविषयी माहिती आहे. बाळासाहेबांनी विदेशी कंपन्यांना केलेला विरोध, बाबरी उध्वस्त प्रकरण, मुंबईतील दंगल अशा मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिका तसेच जगातील अनेक विद्यापीठानून बाळासाहेब ठाकरे शिकविले जातात. बाबासाहेबांनी ‘असाही ट्रिब्यून ‘ह्या जपानी दैनिकात व्यंगचित्रकारीता केली आहे. चर्चीलवरील पुस्तकात साहेबांची व्यंगचित्रे समाविष्ट आहेत. जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेना देखील जागतिक स्तरावर नेवून ठेवली असेच म्हणावे लागेल, असेही प्रशांत आष्टीकर यांनी सांगितले.