कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुलाची शिरोली व नागाव (ता. हातकणंगले) गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले.
कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीत हातकणंगले व करवीर तालुक्यातील सुमारे 19 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पण, महानगरपालिका कोल्हापूर शहरात नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने हद्दवाढीचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत फंडातून सर्व नागरी सेवा सुविधा देण्यास सक्षम आहोत. त्यामुळे या राक्षशी हद्दवाढीला विरोध करण्याचा निर्णय उचगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱयांनी घेतला होता. त्या अनुषंगाने रविवारी पुलाची शिरोली व नागाव गाव बंद ठेवून हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. रविवारी संपूर्ण गाव बंदमध्ये सहभागी झालेले नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, लहान-मोठे उद्योजक या सर्वांचे शिरोली सरपंच पद्मजा करपे व नागाव सरपंच विमल शिंदे यांनी आभार व्यक्त केले.