
दापोलीत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दाणादाण उडवली आहे. भारजा नदीला आलेल्या पुराने मांदिवली पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतुक पुर्णतः थांबली आहे.
दापोली तालूक्यातील मांदिवली आणि मंडणगड तालूक्यातील चिंचघर या दोन तालूक्यांना जोडणारा मांदिवली नावाचा भारजा नदीवर पुल आहे. या भारजा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहु लागल्याने पुलावरून होणारी वाहतुक थांबली आहे. दापोली तालूक्यातील मांदिवली, आमखोल वांझळोली, कवडोली, रावतोली, उंबरशेत, केळशी, आतगाव, उटंबर, आंबवली बुद्रुक, आडे, इळणे, लोणवडी, वाघीवणे, माळवी, शिवाजी नगर, बोरथळ आणि पाडले आदी गावांसाठी महत्वाचा असलेला आणि दापोली मंडणगड या दोन तालूक्यांना जोडणारा मांदीवली पुल हा भारजा नदीवर बांधण्यात आला आहे. या मांदिवली पुलामुळे मंडणगड तालूक्यातील चिंचघर, शेवरे, देव्हारे, आंबवली खुर्द, जावळे आदी गावासह मंडणगड तसेच हरिहरेश्वर श्रीवर्धनकडे जाणारा मार्ग महत्वाचा मार्ग आहे.याच मंडणगड मार्गावरून पुणे,मुंबईकडे, ठाणे, बोरीवली, महाड आदी जाणा-या एस.टी. बसेस या दापोलीतील या गावांकडे दररोज धवत असतात. अशा मार्गावरील भारजा नदीच्या मांदिवली पुूलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतुक थंाबली आहे.
मांदिवली पुलाचा प्रश्न ऐरणीवर
दापोली तालूक्यातील रोवल, उंबरशेत तसेच नव्याने होवू घातलेली मांदिवली येथील मायनींग यामुळे या पुलावरून खणून काढलेल्या बाॅक्साईट खनिजाची अवजड वाहनांमधून मांदिवली या पुलावरूनच वाहतुक होत असते. अशा पुलाला अवजड वाहतुकीमुळे तडेही गेले होते अशा या पुलाची आता उंची वाढवून पूल नव्याने बाधण्यासाठी गरजेचे झाले आहे या पुलाजवळच अनंत भानत यांचे निवासाचे घर आहे अनंत भानत यांच्या घरालाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे
भारजा नदीवरील मांदिवली पुलावरून पावसाळयात पुराचे पाणी वाहणे ही दरवर्षीच्या पावसाळयातील एक नेहमीचीच समस्या बनली आहे .त्यामुळे हा पुल नव्याने बांधून या पुलाची उंची वाढवावी म्हणजे या पुलावरून पावसाळयात खंडीत होणारी वाहतूक पुर आल्याने खंडीत होणार नाही व वाहतुक सुरळीतपणे सूरू राहील आणि दापोलीकडील गावाची पुणे, मुंबई, बोरीवली, ठाणे, हरिहरेश्वर,मंडणगड, महाड कडे होणारी वाहतुक सुरळीतपणे सुरू राहील.
गुणाजी गावणुक, सामाजिक कार्यकर्ते, आमखोल, ता. दापोली