
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात घुसखोरीप्रकरणी एका यूट्युबरवर बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बीकेसीतील जीओ सेंटरमध्ये ते कशासाठी आला होता याचा तपास बीकेसी पोलीस करत आहेत. सुरक्षा रक्षकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तो यूटय़ुबर असून नालासोपारा येथे राहत असल्याचे सांगितले. गेट नंबर 10 येथून तो विनापरवाना आत शिरला होता. त्याला सुरक्षा रक्षकाने तेथून जाण्यास सांगितले, मात्र तो तेथून जाण्यास तयार नव्हता. याची माहिती बीकेसी पोलिसांना दिली. सुरक्षा रक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी यूटय़ुबरविरोधात गुन्हा नोंद केला.