
वार्डात रुग्ण तपासत असताना चोरटय़ाने महिला डॉक्टरचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार या महिला डॉक्टर असून त्या केईएम रुग्णालयात एमडीचे शिक्षण घेतात. शनिवारी रात्री त्या डय़ुटीला आल्या. एका वॉर्डात त्या रुग्ण तपासत होत्या. त्याने टेबलवर त्याचा फोन ठेवला होता. त्यानंतर त्या रुग्ण तपासत होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या टेबलजवळ गेल्या. त्यांना मोबाईल टेबलवर दिसला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने सीसीटीव्ही कॅमेऱयाची तपासणी केली.