मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला यांची जबरदस्त कामगिरी

हिंदुस्थानी वंशाचे सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून दहा वर्षे पूर्ण केली. फेब्रुवारी 2014 मध्ये सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टचा कार्यभार हाती घेतला. 40 वर्षे जुन्या कंपनीमध्ये त्यांनी बरेच बदल केले. नाडेला यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर लक्ष केंद्रीत केले. नाडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने क्लाऊड कॉम्प्युटिंगमध्ये मार्केटमधील आपली भागीदारी दुप्पट केली. ऍमेझॉननंतर ‘नंबर 2’ चे स्थान पटकावले. मागील दहा वर्षांत सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टसाठी कोणते महत्त्वाचे डील केलेय, त्याची माहिती समोर आलीय. त्यामध्ये ‘गिटहब’ या कंपनीच्या अधिग्रहणाच्या डीलचा समावेश आहे.