
केरळमधील कन्नूर जिह्यातील चेंगलयी येथे पावसासाठी खड्डा खोदताना महिला मजुरांना खजिना सापडला. खड्डा खोदत असताना त्यांना सोने-चांदीने भरलेला कंटेनर सापडला. त्या कंटेनरमध्ये बॉम्ब असू शकतो अशी भीती मजुरांना वाटल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून कंटेनर उघडून आपल्या ताब्यात घेतला. सरकारी शाळेजवळ खोदकाम करताना मजुरांना मौल्यवान वस्तू सापडल्या.