आमची पुढची रणनिती ठरली, 20 तारखेपासून कडक उपोषण करणार; मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा

आम्ही कधी म्हणलं तुमचं काम सुरू नाही आणि कधी म्हणणारही नाही. मात्र, मला माझ्या समाजासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. एक महिन्याचा वेळ दिला, या महिन्यात काय झालं, काय केलंय हे आमच्या लक्षात आले होते. तसेच 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळणार नाही, हे ही कळलं होतं. आम्ही तुम्हाला दोष देत नाही आणि देऊन उपयोग ही नाही. आता आजपासून आमची पुढची रणनिती सुरू झाली. आम्ही संयम बाळगळा आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच 20 तारखेपासून कठोक उपोषण करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. अंतरवाली सराटीत रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.

जरांगे म्हणाले की, आम्ही कधी म्हणालो नाही की, सरकारवरचा विश्वास उडाला म्हणून. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून सगेसोयरे अंमलबजावणी होऊ देत नसतील. देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण मिळू नये, म्हणून मंत्र्यांवर दबाव आणत असतील. मात्र, आता कसं मिळवायच आम्ही बघू, असा इशारीही जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

काही मंत्री मराठ्यांवर अन्याय करतात
संयम आम्हीच किती दिवस बाळगायचा हा आमच्यासमोर प्रश्न आहे. 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, पुढे कसं मिळवायचं हे आम्ही बघतो. शनिवारी संभाजीनगरला लाखोंच्या संख्येने माता माऊल्या सकाळी 10 वाजल्यापासून उपस्थित होत्या. रात्रीचे 9 वाजले तरी जागच्या हलल्या नाहीत. पैसे देऊनही आणले तरी इतक्या वेळ कोणी बसू शकत नाही. आता 20 तारखेला उपोषण आणखी कठोर करणार आहे. समाजाचे म्हणणे आहे की, मी उपोषण करू नये. लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे, असे त्यांचे मत आहे. मात्र, ते बदलावे लागेल. मला असे वाटते कोटीने लोक जगले पाहिजे, एक मेला तरी चालेल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपले बलिदान गेले तरी चालते. पण समाज मोठा झाला पाहिजे, त्यासाठी परत एकदा उपोषण करावे, असे मला वाटते. आपल्या उपोषणांने ते शहाणे झाले तर ठीक… नंतर आपण तारीख ठरवून मुंबईला जायचे. मराठ्यांची बैठक कधी ठेवायची, त्यावेळी ठरवू. महाराष्ट्राचे मत घेऊन 20 तारखेनंतर बैठक तारीख ठरवली जाईल आणि तेव्हा फायनल केलं जाईल. परत बैठक होणार नाही, सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्यानंतर सरकारकडून मला कुठलाच फोन किंवा मेसेज आला नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई सांगतील किंवा त्यांची लोक पाठवतील. काय झालं काय मिळवलं. ते सांगतील ते काय काय झालं ते बघू या, त्यांचा फोन नाही आला तरी आमची तयारी सुरू झाली आहे. ज्या माणसाला आपण विरोधक मानत नाही तशांना उत्तर देणार नाही. त्यामुळे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके म्हणतात. मुंबई जाम करावयाची त्यांना मी विरोधक मानत नाही. त्यांचा कर्ता करविता भुजबळ असून धनगर समाजाला वाटते एसटीतून आरक्षण मिळाले तर आपल्या लेकरांना आणखीन सुविधा मिळतील, असेही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षणाचा लढा लढण्यासाठी कोणाला प्रस्ताव द्यावा मला काही कळत नाही. आपण समान दुःख असणारे बांधव आहोत, दलित,मुस्लिम, लिंगायत, धनगर इतर समाज आपण सगळे समविचारी आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित यावे आणि दणका द्यायचा. एकत्रित यायला समाज कुठे नाही म्हणला, मला काही नेते माहीत नाही,सगळे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल. नेत्यांना आवाहन करण्यापेक्षा सर्व सामान्यांनी एकत्र यावं, आपण सत्ता परिवर्तन करू शकतो,सगळे समाज एकत्र आले तर जाती वाद बंद होईल. स्वतःहून एकुण आले तर आपली जात मोठी होईल, निमंत्रण देण्यापेक्षा आपण स्वतःहून एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे.सगळ्यांनी एकमेकांना मदत करून मतदान करून आपआपली जात मोठी करण्यासाठी एकत्र यावे. मला नेतृत्व करायचं नाही, मला नेतृत्व करायची हौस नाही, मी मराठा सेवक म्हणून काम करीत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

समदुःखी आहोत, एकत्र यावे
भविष्यात वंचित बहुजन नेते प्रकाश आंबेडकर व ओवेसी माझ्यासोबत एकत्रित येतील का, हे मला माहित नाही. मात्र, माझं मत आहे एकत्र यावं, बदल घडेल. तुम्ही नाही आले तर आम्ही सरकारला पाडायला मोकळे असल्याचे ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.