सोन्याच्या विटा चोरणारा नोकर अटकेत

व्यावसायिकाच्या घरातून सोन्याच्या विटा चोरून नेणाऱया नोकराला जुहू पोलिसांनी अटक केली. प्रभुनारायण मिश्रा असे त्याचे नाव आहे. मिश्राला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्याकडे मिश्रा हा गेल्या अठरा महिन्यांपासून कामाला होता.

काही दिवसांपूर्वी मिश्रा हा नोकरी सोडून निघून गेला होता. नुकतेच तक्रारदार याने कपाटाची पाहणी केली. तेव्हा त्यांना कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या विटा दिसल्या नाहीत. सोन्याच्या विटा चोरीप्रकरणी त्याने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मिश्राच्या अटकेसाठी पोलिसांची पथके तयार केली. तपासा दरम्यान पोलिसांना मिश्राची माहिती मिळाली. पोलिसांनी मिश्राला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्ल्यानंतर मिश्राने चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.